भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानची चांगलीच गोची झाली आहे. पाकिस्तानने भारताकडे याचना करायला सुरुवात केली आहे. दुबईत याचे पडसाद उमटले आणि एका हिंदू तरुणाला तेथील पाकिस्तानी सहकाऱ्यांनी या रागातून पाणी नाकारले.
१५ मे रोजी उत्तराखंडमधील उधमसिंह नगर पोलिसांनी एक धक्कादायक माहिती शेअर केली . पोलिसांचे म्हणणे होते की, दुबईमध्ये कामासाठी गेलेल्या किच्छा (उधमसिंह नगर) येथील विशाल या हिंदू युवकावर पाकिस्तानी सहकाऱ्यांनी सूडाच्या भावनेने अन्याय केला. भारत सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर इंडस वॉटर ट्रीटी (सिंधू जलसंधी) स्थगित केल्यानंतर, दुबईतील पाकिस्तानी कामगारांनी विशालला मुद्दाम पाणी न देण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा:
“राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावर कुठेही कमी पडणार नाही”
राऊतांचे पुस्तक म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट!
दिल्लीत १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक!
भाजपा आमदार रवींद्र सिंह नेगी यांनी बेटिंग सेंटरवर चालवला बुलडोझर!
काय घडले दुबईत?
विशाल काही महिन्यांपूर्वी काशीपूरमधील समीर नावाच्या एजंटमार्फत दुबईला गेला होता. तेथील पाकिस्तानी सहकाऱ्यांनी त्याला सतत छळायला सुरुवात केली. त्यांना म्हणणं होतं, “भारताने आमचं पाणी थांबवलं आहे, त्यामुळे तुलाही पाणी मिळणार नाही. पाणी न मिळाल्यामुळे आणि छळामुळे विशालचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य ढासळलं. त्याने भारतातील आपल्या कुटुंबीयांना अनेक वेळा संपर्क करून मदतीची याचना केली. कुटुंबीयांनी ८ मे रोजी काशीपूरच्या बांसफोडन पोलीस चौकीत तक्रार दाखल केली.
याबाबत एसएसपी मणिकांत मिश्रा यांनी तातडीने लक्ष घातलं. एजंट समीरकडून सर्व माहिती घेतली. दुबईतील काही सहकाऱ्यांच्या मदतीने विशालचा संपर्क कुटुंबीयांशी करून दिला. त्याचा पासपोर्ट मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि परतीसाठी तिकीटही मिळवण्यात आले. अखेर विशालला भारतात सुरक्षित परत आणण्यात यश आलं. १५ मे रोजी विशाल आणि त्याच्या कुटुंबीयांनी एसएसपी कार्यालयात येऊन पोलिसांचे मनापासून आभार मानले.
पहलगाम आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी
२२ एप्रिल २०२५ रोजी लष्कर-ए-तैयबाच्या TRF (The Resistance Front) या गटाने पहलगाम (जम्मू-काश्मीर) मध्ये २६ निष्पाप हिंदूंची हत्या केली. त्या उत्तरादाखल, भारत सरकारने सिंधू जलसंधी रद्द करत पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत PoJK आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. पाकिस्तानने प्रतिउत्तर दिल्यावर भारताने त्यांच्या हवाई तळांवर सर्जिकल स्ट्राइक केले, ज्यामुळे पाकिस्तानने अमेरिकेकडे मध्यस्थीसाठी धाव घेतली. १२ मे रोजी भारत आणि पाकिस्तानचे DGMOs मध्ये फोनवरून चर्चेनंतर युद्धविराम जाहीर झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शांततेचे श्रेय घेतले, परंतु भारताने स्पष्टपणे सांगितले की ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे आणि कोणत्याही तृतीय पक्षाचा यात सहभाग नाही.







