29.6 C
Mumbai
Tuesday, May 12, 2026
घरराजकारणएकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग

एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

Google News Follow

Related

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला गुरुवारी दुपारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड परिसरात जात असताना अचानक आलेल्या वादळी हवामानाचा फटका बसला. सुदैवाने वैमानिकाने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर सुरक्षितपणे मुंबईतील जुहू हेलिपॅडवर उतरवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे अधिकारी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
सोन्यात गुंतवणुकीला डिजिटल टच; ‘EGR’ काय आहे?

ताज आणि ट्रायडंट हॉटेलला दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा ताब्यात

परदेशी नोकरीचे आमिष दाखवून ‘सायबर गुलामगिरी’

पश्चिम बंगालला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा…बांगलादेशचा नेता नुरुल हुडाचे फुत्कार

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याण-मुरबाड भागातील एका लग्न समारंभासाठी जात होते. त्यावेळी राज्यात अनेक भागांत अवकाळी पावसासह जोरदार वारे आणि वादळी परिस्थिती निर्माण झाली होती. मुरबाडच्या दिशेने उड्डाण सुरू असतानाच हवामान अचानक बिघडले आणि हेलिकॉप्टर वादळाच्या कचाट्यात सापडले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच वैमानिकाने तातडीने सुरक्षिततेचा निर्णय घेत हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवले.

वादळी वाऱ्यांमुळे दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे मुरबाडमध्ये नियोजित लँडिंग टाळण्यात आले. अखेर हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू येथील पवनहंस हेलिपॅडवर सुरक्षित उतरवण्यात आले. या संपूर्ण घटनेदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा