27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरराजकारणशिवसेनेला बाजुला ठेवून मुख्यमंत्री होऊच शकत नाही!

शिवसेनेला बाजुला ठेवून मुख्यमंत्री होऊच शकत नाही!

Related

मुख्यमंत्री पद सोडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांची खदखद कायम

मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. अजूनही त्यांच्या मनात खदखद कायम आहे. अमित शहा यांच्याशी दोन वर्षांपूर्वी झालेल्या भेटीबद्दल उद्धव ठाकरे नियमितपणे बोलत आले आहेत शुक्रवारी शिवसेना भवनात पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर ते बोललेच, पण शिवसेनेला बाजुला ठेवून मुख्यमंत्री होऊच शकत नाही, असे विधान त्यांनी केले.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी तीन मुद्दे उपस्थित केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यात आणि अमित शहा यांच्यात ठरले होते. अडीच वर्षांचा काळ वाटून घ्यावा तसे झाले असते तर आज अडीच वर्षे सन्मानाने पार पडली असती. पहिल्या अडीच वर्षात भाजपाचा किंवा सेनेचा झाला होता. त्यावेळी नकार देऊन आज असे का केले. जनतेलाही प्रश्न पडला. शिवसेना तुमच्यासोबत होती. हेच ठरले होते. अडीच वर्षांपूर्वी शब्द मोडला, पाठीत वार करून शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून शिवसेनेला बाजूला ठेवून मुख्यमंत्री होऊ शकत नाही.

 

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घेण्यात आलेल्या मेट्रोच्या आरे कारशेडचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी थांबविला. तो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलण्यात येणार आहे. म्हणजे कारशेड आता आरेमध्येच होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे चिडले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, कदाचित चेहरा पडलेला दिसत असेल. माझ्यावर राग आहे तो काढा. मुंबईच्या काळजात कट्य़ार घुसवू नका. आरेसंदर्भातील निर्णयाने दुःख झाले. मी स्थगिती दिली होती. मुंबईच्या विकासात आड येत नव्हतो. कांजूरचा पर्याय दिला होता. पर्यावरणाच्या सोबत आहे मी. आजही मत आहे की कृपा करून मुंबईवर राग काढू नका. कांजूरचा प्रस्ताव दिलेला आहे त्यात अहंगड नाही. आरेचा आग्रह धरू नका.

हे ही वाचा:

“सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला ठाकरेंना पाहवत नाही”

उस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

१२ जुलैला पंतप्रधान मोदी झारखंड दौऱ्यावर

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; मेट्रो कारशेड आरेतच!

 

महाविकास आघाडीचे सरकार असताना लोकशाहीची हत्या झाल्याचे अनेकवेळा मविआ सरकारमधील नेते, खासदार, प्रवक्ते बोलत होते. त्याचीच री उद्धव ठाकरे यांनीही ओढली. लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. लोकशाही कोसळली तर या स्तंभांना अर्थ राहणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा