30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणअजित पवारांच्या कार्यक्रमात कोविड नियमांना हरताळ

अजित पवारांच्या कार्यक्रमात कोविड नियमांना हरताळ

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याची घटना घडली आहे. पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला असून यावरून आता त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे.

शनिवार, १९ जून रोजी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. पण या कार्यक्रमात कोविड नियमावली पायदळी तुडविण्यात आली. या उद्घाटनाच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. या संपूर्ण कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला दिसला. तर जमलेल्या कार्यकर्त्यांपैकी काही जणांनी तर चेहऱ्यावर मास्कही लावले नव्हते.

हे ही वाचा:
मुख्यमंत्री लवकरच घराबाहेर पडणार

काँग्रेसला पुन्हा स्वबळाची आठवण

प्रताप सरनाईक मातोश्रीवर?

कोण होतीस तू? काय झालीस तू??

महाराष्ट्र सरकारमधील एका प्रमुख पक्षाच्या कार्यक्रमात आणि राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अशा बेजबाबदारपणे घडलेल्या वर्तनाबद्दल समाजातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपण अजूनही पूर्णपणे बाहेर आलेले नसताना आणि तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभे असताना अशाप्रकारे गर्दी जमुन कोविड नियम पायदळी तुडवणे याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपूर्वी खबरदारीचा भाग म्हणून पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर पुण्यातून बाहेर फिरायला जाण्याऱ्यांसाठी नियम कडक करत त्यांना पंधरा दिवसांसाठी क्वारंटाईन काळ बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे खुद्द अजित पवार यांनीच शनिवारी या संबंधी घोषणा केली आहे आणि त्यानंतर त्यांच्याच कार्यक्रमात गर्दीने सर्व मर्यादा ओलांडून कोविड नियमांना हरताळ फासले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा