दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान ५ फेब्रुवारीला पार पडले आणि त्यांनतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्व संस्थांनी भाजपा २७ वर्षांनी दिल्लीत सरकार बनवणार यावर शिक्कामोर्तब केले आहे. या पोलमध्ये आम आदमी पक्ष सरकार स्थापनेची हॅट्ट्रिक करेल असे मात्र कुणीही म्हटलेले नाही. आम आदमी पक्षाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागेल आणि काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली जाईल, असेही हे पोल म्हणतात.
आम आदमी पक्षाने इथे २०१५, २०२० या दोन टर्ममध्ये सरकारे बनवली आहेत पण यावेळी अँटी इन्कमबन्सीचा फटका त्यांना बसेल असे म्हटले जात आहे. भाजपला सरासरी ३९ जागा मिळतील असे हे सगळे पोल म्हणत आहेत. ७० जागांपैकी बहुमतासाठी ३६ जागा हव्या आहेत. आम आदमी पक्षाला ३० जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेसला मात्र दुहेरी आकडाही गाठता येणार नाही, असे हे पोल म्हणतात.
मॅट्रिझने आम आदमी पक्षाला ३२ ते ३५ आणि भाजपाला ३५ ते ४० जागा दिल्या आहेत तर काँग्रेसला अवघी १ जागा दिली आहे. पीपल्स प्लसने आम आदमीला १० ते १९ आणि भाजपला ५१ ते ६० जागा दाखवल्या आहेत. माईंड ब्रिन्कने आपला सरकार स्थापन करण्याची संधी असल्याचे म्हटले असून ४० ते ४९ जागा दिल्या आहेत तर भाजपला २१ ते २५ जागा दिल्या आहेत. पी मार्कने आपला २१ ते ३१ आणि भाजपला ३९ ते ४९ जागा दिल्या आहेत. तर टाइम्स नाऊ जेव्हीसीने भाजपला ३९ ते ४५ जागा आणि आपला २२ ते ३१ जागा दिल्या आहेत.
हे ही वाचा:
ईडीकडून १९ ब्रोकिंग कंपन्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल
फडणवीस राजकारणातला बिनजोड पैलवान, बाहुबली!
उत्तराखंडमध्ये एका लिव्ह इन रिलेशनशिपची नोंद
महाराष्ट्रात १ कोटी तर मुंबईत १० लाख बांगलादेशी घुसखोर!
या एक्झिट पोलनंतर दिल्लीतील भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेव म्हणाले की, ‘आप’दा आता जात आहे. तर आम आदमीच्या नेत्या रिना गुप्ता म्हणाल्या की, आम आदमी पार्टी ऐतिहासिक विजय मिळवणार असून चौथ्या वेळेला केजरीवाल मुख्यमंत्री होतील.