मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (५ फेब्रुवारी) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भाजपा आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी सुरेश धस यांनी तुफान फटकेबाजी केली. सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा उल्लेख बाहुबली असा केला. तसेच मुख्यमंत्री फडणवीसांना बिनजोड पैलवान म्हणाले.
सुरेश धस यांनी आपल्या भाषणात आपल्या संघर्षाची आठवण सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी २००७ पासून खुंटेफळ उपसा सिंचन प्रकल्पासाठी केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा बाहुबली असा उल्लेख केला.
ते पुढे म्हणाले, २०१९ मध्ये पूर्ण बहुमत येवून सुद्धा फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले नाहीत. जनादेश फडणवीसांच्या बाजूने होता. पण पहाटेच जनादेश चोरून नेला. त्यावेळी तुम्हाला कौटुंबिक आणि राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे काम झाले. पण तुम्ही विरोधी पक्षनेता असताना कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला, त्याला तोड नाही. बिनजोड पैलवान म्हणतात ते तुम्ही आहात, असे सुरेश धस यांनी म्हटले.
हे ही वाचा :
महाराष्ट्रात १ कोटी तर मुंबईत १० लाख बांगलादेशी घुसखोर!
दिल्ली निवडणुका: बोगस मतदान रोखण्यासाठी प्रयत्न, बांगलादेशी घुसखोरांवर नजर!
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या बातम्या माध्यमं पेरतात!
जीएसटी परिषद कर दर तर्कसंगत करण्याच्या निर्णयाच्या जवळ
मला मंत्रीपद, पालकमंत्रीपद नको, आणखी काही देऊ नका. हे चार टीएमसी, तिकडचे साडे तीन टीएमसी पाणी द्या असे सांगत धस पुढे म्हणाले की मला हिणवतात. काय आहे याचे मुख्यमंत्र्यापाशी. मला विचारता…तेरे पास क्या है. मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद असाच ठेवा अशी मागणी धस यांनी यावेळी केली.