31 C
Mumbai
Saturday, November 15, 2025
घरविशेषअटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्राची दमदार वाटचाल

अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्राची दमदार वाटचाल

वर्षभरात ३० हजार युवकांना रोजगार, ११ हजार युवकांना प्रशिक्षण

Google News Follow

Related

कांदिवली (पूर्व) येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्राने (ABVKVK) सुरूवातीपासून केवळ एका वर्षात आपल्या मल्टी-स्किल्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (MSTI) आणि प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून सुमारे ३०,००० युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून ११,५०० युवकांना विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षित केले आहे. भारताला जगातील “Skill Capital” बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या कल्पनेतून जन्म घेतलेले हे केंद्र कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीचे आदर्श केंद्र ठरत आहे.

७ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिकेच्या सक्रिय सहकार्याने, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र स्थापन करण्यात आले. आज हे केंद्र केंद्र, राज्य आणि स्थानिक शासनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे साकारलेल्या “त्रिसूत्री शासन मॉडेल”चे उत्कृष्ट उदाहरण आहे.
यावेळी बोलताना मंत्री गोयल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, एनडीए सरकार देशातील युवकांना आत्मविश्वास, कौशल्य आणि संधी प्रदान करत आहे. कौशल्यविकास हा भारताच्या विकासकथेतला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आमचे उद्दिष्ट आहे. कोणताही मेहनती युवक बेरोजगार राहू नये. प्रत्येक व्यक्तीला बदलत्या अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार योग्य कौशल्य शिकण्याची संधी मिळावी. कांदिवलीतील ABVKVK केंद्र हे केवळ मुंबईतील युवकांसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदर्श केंद्र ठरेल.

हेही वाचा..

पीएम मोदींनी क्वालकॉमच्या सीईओसोबत महत्वाच्या विषयावर केली चर्चा

गिल”चा ग्लॅमरस डाव — आता ‘कोहली’च्या बरोबरीवर!

“भाजपचा सच्चा सिपाही आहे, निवडणूक लढवायला आलो नाही”

आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार आत्महत्येप्रकरणी मोठी कारवाई

असे अनेक नवे केंद्र स्थापन करण्याचे नियोजन सुरू आहे, ज्यामुळे उत्तर मुंबई ‘स्किलिंग हब’ म्हणून उदयास येईल आणि युवा पिढी २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेत सक्रिय योगदान देईल.” या केंद्राने १०० हून अधिक नामांकित उद्योगसंस्थांसोबत भागीदारी केली असून मायक्रोसॉफ्ट, एचपी, आयटीसी हॉटेल्स, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, ब्लू स्टार, कॉस्मॉस आणि लॉरिएल यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या साहाय्याने विविध क्षेत्रांतील प्रशिक्षण आणि रोजगार सुविधा पुरवल्या जात आहेत.

सायबरसुरक्षा, आयटी/आयटीईएस, हॉस्पिटॅलिटी, फायनान्स मॅनेजमेंट, गेमिंग आणि अॅनिमेशन, अपॅरेल आणि टेक्सटाइल्स, ब्युटी अँड वेलनेस आणि व्हाइट गुड्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये उच्च प्रतीचे कौशल्यविकास प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय, या केंद्रात युवकांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देऊन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये शाश्वत व्यवसाय पद्धतींचा प्रसार केला जात आहे. केंद्रात वयोवृद्धांसाठी वित्तीय गुंतवणुकीविषयी जागरूकता सत्रे, तसेच कांदिवलीतील महिलांसाठी जीवन विमा आणि आर्थिक नियोजनाविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

केंद्राची प्रमुख वैशिष्ट्ये: मुंबई व ठाण्यातील १०० हून अधिक कंपन्यांनी पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत इंटर्नशिपसाठी सहकार्य केले आहे. प्रशिक्षण आणि रोजगार: एका वर्षात ३०,००० युवकांना रोजगार व ११,५०० जणांना प्रशिक्षण. आयटी/आयटीईएस: इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट आणि एमएसएमई अपस्किलिंगद्वारे ८,००० प्रशिक्षणार्थींपैकी ७,००० ना देशभरात रोजगार. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण: मायक्रोसॉफ्ट आणि एचपी यांच्या सहकार्याने ५०० हून अधिक सहभागी प्रशिक्षित. सायबरसुरक्षा (DSCI): भारतातील पहिली सर्व-महिला सायबरसुरक्षा बॅच सुरू; वार्षिक ₹५ लाखांपर्यंतच्या प्रारंभिक पगाराच्या संधी.

BFSI (बजाज फिनसर्व्ह): १००% प्लेसमेंट – १,५०० उमेदवार प्रतिष्ठित वित्तीय संस्थांमध्ये कार्यरत. ग्रीन बिझनेस आणि उद्योजकता: MSME क्षेत्रात शाश्वत व्यवसाय पद्धतींवर भर. इतर क्षेत्र: ब्युटी अँड वेलनेस (L’Oréal India), वस्त्रोद्योग, व्हाइट गुड्स (Blue Star), गेमिंग व अॅनिमेशन (Cosmos), फॅसिलिटी मॅनेजमेंट, Jubilant Foodworks इ. वरिष्ठ नागरिक सत्र: गुंतवणूक जागरूकता कार्यक्रम. LIC जीवन विमा सत्र: ४५० महिलांना आर्थिक नियोजनाविषयी प्रशिक्षण. केंद्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांसाठी इंग्रजी भाषणकला आणि संगणक साक्षरता कार्यक्रमही सुरू आहेत. ग्रीन मुंबई समिट २०२५ मध्ये सहभागी झाल्यानंतर केंद्राने हरित अर्थव्यवस्थेशी संबंधित कौशल्य अभ्यासक्रम सुरू केले आहेत. तसेच, दिव्यांग व्यक्तींसाठीही मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्रे आयोजित केली गेली आहेत.

अलीकडेच सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडने या केंद्राशी सहकार्याच्या दिशेने चर्चा सुरू केली आहे. पीयूष गोयल यांच्या निवडणुकीनंतर केवळ पाच महिन्यांत उभारलेले हे जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. आज अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र मुंबईतील युवकांना कौशल्य आणि रोजगाराच्या नव्या युगात नेणारे केंद्र म्हणून उभे आहे. लवकरच अशा आणखी केंद्रांमुळे उत्तर मुंबई भारताच्या “स्किल हब” मध्ये रूपांतरित होईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा