27.5 C
Mumbai
Monday, July 14, 2025
घरविशेषशुभांशु, तुमचा प्रवास हा नव्या युगाची सुरुवात!

शुभांशु, तुमचा प्रवास हा नव्या युगाची सुरुवात!

पंतप्रधान मोदींनी साधला अंतराळ स्थानकातील शुभांशु शुक्लाशी संवाद

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) जाणारे पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी आणि शुभांशू शुक्ला यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ ‘नरेंद्र मोदी’ या यूट्यूब चॅनलवर थेट प्रसारित केला गेला.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणतात, “आज तुम्ही आमच्या मातृभूमीपासून दूर आहात, पण तुम्ही भारतीयांच्या हृदयाच्या सर्वात जवळ आहात… तुमच्या नावातच शुभता आहे आणि तुमचा प्रवास एका नव्या युगाची सुरुवात आहे.” ते म्हणाले की सध्या आपण दोघेही बोलत आहोत, पण १४० कोटी भारतीयांच्या भावनाही माझ्यासोबत आहेत. माझ्या आवाजात सर्व भारतीयांचा उत्साह आहे. अंतराळात भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो.

पंतप्रधान मोदींनी शुभांशूला विचारले की तो तिथे कसा आहे?. यावर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला म्हणाले, “पंतप्रधान मोदी, तुमच्या शुभेच्छा आणि १४० कोटी भारतीयांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. मी येथे ठीक आहे आणि सुरक्षित आहे. मला खूप चांगले वाटत आहे, हा एक नवीन अनुभव आहे… हा प्रवास केवळ माझा नाही तर संपूर्ण देशाचा प्रवास आहे. तुमच्या नेतृत्वाखाली, आजचा भारत एखाद्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी असंख्य संधी देतो. येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मला खूप अभिमान आहे.”

शुभांशूशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की परिक्रमा करणे ही भारताची शतकानुशतके जुनी परंपरा आहे. तुम्हाला पृथ्वीमातेची परिक्रमा करण्याचे सौभाग्य मिळाले आहे. शुभांशू शुक्ला म्हणाले की, जेव्हा आम्ही अंतराळात आल्यानंतर पहिल्यांदा भारत पाहिला तेव्हा तो खूप मोठा, भव्य नकाशावर बघतो त्यापेक्षा खूप मोठा दिसला. जेव्हा आपण पृथ्वीकडे पाहतो तेव्हा असे दिसते की त्याला कोणत्याही सीमा नाहीत आणि कोणतेही देश अस्तित्वात नाहीत. पृथ्वी एक दिसते. आपण सर्व मानवतेचा भाग आहोत आणि पृथ्वी हे आपले एक घर आहे आणि आपण सर्व त्यात आहोत.”

पंतप्रधान मोदींनी त्यांना विचारले की तुम्ही अंतराळात सोबत आणलेला ‘गाजर का हलवा’ खाल्ला का?. यावर शुभांशू शुक्ला म्हणतात, “हो, मी गाजर का हलवा, मूग डाळ का हलवा आणि आंब्याचा रस आणला होता. माझ्यासोबत इतर देशांमधून आलेल्या प्रत्येकाने समृद्ध भारतीय जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी माझी इच्छा होती. आम्ही सर्वांनी ते एकत्र खाल्ले आणि सर्वांना ते आवडले.”

हे ही वाचा : 

तुतारीची झाली पुंगी..

पाकिस्तानात लष्करी ताफ्यावर आत्मघातकी हल्ला, १३ सैनिक ठार, १० जखमी!

ट्रेड डील…डेटावरून भारत अमेरिकेला भिडला!

“समाजवाद” आणि “धर्मनिरपेक्ष” हे शब्द संविधानाच्या उद्देशिकेत असावेत का ?

दरम्यान, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला २५ जून रोजी ‘ऐक्सीओम मिशन ४’ अंतर्गत आयएसएसला रवाना झाले. शुभांशू यांनी अवकाशात पोहोचून देशाला अभिमानाने गौरवले आहे. शुभांशू अंतराळ स्थानकात पाऊल ठेवणारे पहिले भारतीय बनले. ते १४ दिवस आयएसएसवर राहतील आणि याकाळात वैज्ञानिक प्रयोग केले जातील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा