28.6 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरविशेषRAW च्या प्रमुखपदी आयपीएस पराग जैन!

RAW च्या प्रमुखपदी आयपीएस पराग जैन!

रवी सिन्हा यांची घेणार जागा 

Google News Follow

भारतीय गुप्तचर संस्था RAW ला नवीन प्रमुख मिळाला आहे. पराग जैन यांना रिसर्च अॅनालिसिस विंग (RAW) चे नवे प्रमुख बनवण्यात आले आहे. पराग जैन हे १९८९ च्या बॅचचे पंजाब केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा RAW प्रमुख म्हणून कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. ते सध्याचे प्रमुख रवी सिन्हा यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. ते १ जुलैपासून पदभार स्वीकारतील. पराग जैन सध्या एव्हिएशन रिसर्च सेंटरचे प्रमुख आहेत. त्यांना पाकिस्तानच्या प्रकरणांचे तज्ज्ञ मानले जाते. ते चंदीगडचे एसएसपी राहिले आहेत.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी सशस्त्र दलांबद्दल गुप्त माहिती गोळा करून या संशोधन केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली होती. जरी हे हल्ले काही मिनिटांत झाले असले तरी, अधिकाऱ्यांच्या मते, त्यामागे वर्षानुवर्षे नेटवर्किंग आणि गुप्तचर तयारी होती, जी पराग जैन यांनी कुशलतेने हाताळली. जम्मू आणि काश्मीरसारख्या संवेदनशील सुरक्षा क्षेत्रात जैन यांच्या दीर्घकाळाच्या सेवा त्यांच्या अनुभवाला आणखी बळकटी देते. जागतिक स्तरावर बदलत्या सुरक्षा परिस्थितीत हा अनुभव आता रॉसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

पराग जैन यापूर्वी चंदीगडचे एसएसपी राहिले आहेत आणि त्यांनी कॅनडा आणि श्रीलंकेत भारतीय प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे. पराग जैन जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात आहेत. त्यांनी संघर्षग्रस्त केंद्रशासित प्रदेशात दहशतवादविरोधी रणनीतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हे ही वाचा : 

“समाजवाद” आणि “धर्मनिरपेक्ष” हे शब्द संविधानाच्या उद्देशिकेत असावेत का ?

सुंदर दिसण्यासाठी घेत होती औषधे, ‘काँटा लगा’ फेम शेफाली जरीवालाचा मृत्यू!

शेफाली जरीवालासह बिग बॉसमधील ‘या’ स्पर्धकांनी अचानक सोडले जग!

“राजस्थानचे मुख्यमंत्री तरुण आहेत, त्यांना बऱ्याच गोष्टी माहित नाहीत”: अशोक गेहलोत

दरम्यान, RAW ची स्थापना २१ सप्टेंबर १९६८ रोजी झाली. या संघटनेचे पहिले प्रमुख आरएन काओ होते. RAW चे सर्वात महत्वाचे काम म्हणजे परदेशात भारताविरुद्ध कट रचला जात आहे का हे शोधणे. याशिवाय, ते गुप्त मोहिमा देखील राबवते. पंतप्रधान स्वतः RAW चे प्रभारी असतात. RAW प्रमुख त्यांचा दैनंदिन अहवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना देतात.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा