‘काटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला हीचा ४२ व्या वर्षी मृत्यू झाला. काल रात्री अचानक तिची तब्बेत बिघडली. त्यानंतर तिला अंधेरीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाहीये. आज (२८ जून) सकाळी फॉरेन्सिक विभागाच्या टीमने तिच्या घरी तपास केला आणि त्यानंतर तिचे पती पराग त्यागीसह चार जणांचा जबाब पोलिसानी नोंदवला.
मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी तिचा मृत्यू हृदय विकारामुळे झाल्याचे समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेफाली जरीवाला तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती. अंधेरीतल्या एका डॉक्टरच्या सल्ल्याने शेफाली विटामिन सी आणि ग्लुटाथिओन या औषधांचे डोस घेत होती.
हे दोन्ही औषधांचे डोस तरुण दिसण्यासाठी, त्वचा गोरी दिसण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी घेतले जातात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी माहिती दिलीय की शेफाली मागील ६ ते ७ वर्षापासून त्यांच्याकडे उपचार घेत होती. मात्र या उपचारांचा तिच्या तब्येतीवर परिणाम होण्यासारखा न्हवता.
हे ही वाचा :
शेफाली जरीवालासह बिग बॉसमधील ‘या’ स्पर्धकांनी अचानक सोडले जग!
“राजस्थानचे मुख्यमंत्री तरुण आहेत, त्यांना बऱ्याच गोष्टी माहित नाहीत”: अशोक गेहलोत
पाच ट्रान्सजेंडरसह १८ घुसखोर बांगलादेशींना अटक!
कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरण, सुरक्षा रक्षकाला अटक!
डॉक्टरांनी हेही सांगितल की, शेफाली खूप फिट होती आणि त्यांच्यासोबत बोलताना त्यांना कसल्याही आजारासंदर्भात तिने सांगितल न्हवत. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट समोर आल्यानंतरच शेफालीचा मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
या प्रकरणी आतापर्यंत चौघांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. यामध्ये दोन घरातील काम करणाऱ्या व्यक्ती, पती आणि सुरक्षा कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तसेच तिच्या डॉक्टरांचा जबाब देखील पोलिस नोंद करणार आहेत. दरम्यान, कुपर रुग्णालयात तिचा पोस्टमॉर्टम केला जाणार आहे, त्यामुळे रिपोर्ट मधून समोर काय येते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
