देशासह राज्यात घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्या नागरिकांना हुसकावून लावण्यासाठी म्हणून कठोर आणि आक्रमक कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या माध्यमातून ही कारवाई केली जात असताना अनेक हिंदुत्ववादी संघटनांनीही या विरोधात आवाज उठवला आहे. जागोजागी मोर्चे काढून जनजागृती केली जात आहे. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातूनही अशाच मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा येथे होणाऱ्या या मोर्चात हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरितांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी हिंदु जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु महासभा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, महाराष्ट्र मंदिर महासंघ, दुर्गा वाहीनी, निवृत्त सेना अधिकारी अशा सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रित पणे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून मोर्चा काढत आहेत. घुसखोरांना आणि त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी साहाय्य करणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना देशाबाहेर हाकलावे, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
हे ही वाचा :
महाराष्ट्रातही आता ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा!
महाकुंभमध्ये लोटला जनसागर; पवित्र स्नान घेणाऱ्या भाविकांची संख्या ५० कोटी पार
महाराष्ट्रातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर नवे फौजदारी कायदे लागू करा!
अमेरिकेतून आलेल्या स्थलांतरितांनी सांगितली ‘डंकी मार्गा’ची सुरवात ते शेवट!
सातारा येथे बांगलादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी अशा अनेक देशांचे घुसखोर निरंकुशपणे वास्तव्य करत आहेत. भारतात अशा अनेक घुसखोरांची संख्या ८ ते १० कोटींच्या घरात आहे, असे अनेक माध्यमातून समोर आले आहे. या घुसखोरांमुळे देशावर संकट निर्माण झाले असून त्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. यासाठी शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी सातारा येथे मोर्चा निघाणार आहे.
- दिनांक- शनिवार, १५ फेब्रुवारी २०२५
- वेळ- दुपारी, ३.३० वाजता
- पत्ता- राजवाडा मारुती मंदिर- मोती चौक- ५०१ पाटी चौक- पोलीस मुख्यालय- शिवतीर्थ, पोवई नाका- जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा