२३ एप्रिलपासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात असलेले बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांना बुधवारी (१४ मे) सकाळी भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. बीएसएफने एका निवेदनात म्हटले आहे की, अमृतसरमधील अटारी येथील चेकपोस्टवर सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास हे हस्तांतरण झाले आणि प्रोटोकॉलचे पालन करून शांततेत पार पडले.
सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सध्या जवान शॉची सविस्तर चौकशी सुरू आहे. बीएसएफने म्हटले की, “आज सकाळी १०.३० वाजता, कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांना अटारी-वाघा सीमेवर बीएसएफने पाकिस्तानमधून परत नेले आहे. कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ २३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.५० वाजता फिरोजपूर सेक्टरच्या परिसरात ऑपरेशनल ड्युटीवर असताना चुकून पाकिस्तानी हद्दीत गेले होते आणि त्यांना पाक रेंजर्सनी ताब्यात घेतले होते.”
दरम्यान, १८२ व्या बटालियनमधील बीएसएफ जवान शॉ यांना २३ एप्रिल रोजी पंजाबमधील फिरोजपूरजवळ चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यानंतर पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले होते. वृत्तानुसार, त्यावेळी ते गणवेशात होते आणि त्यांच्याकडे सर्व्हिस रायफल होती. विश्रांतीसाठी ते सावली असलेल्या जागेकडे गेले. मात्र, त्यावेळी नकळत पाकिस्तानी हद्दीत आणि त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले.
हे ही वाचा :
कर्नल सोफिया कुरेशींच्या घरावर हल्ल्याची खोटी बातमी; आरएसएसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न!
पंतप्रधानांच्या निवासस्थानावर बॉम्ब का टाकला नाही? सवाल करणाऱ्या नवाजला अटक
“नामकरणामुळे अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे वास्तव बदलणार नाही”
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी गीतेवर हात ठेवून घेतली शपथ; कोण आहेत अनिता आनंद?
त्याच्या अटकेनंतर, भारतीय लष्कर आणि पाकिस्तान रेंजर्सच्या अधिकाऱ्यांनी प्रकरण सोडवण्यासाठी आणि जवानाची सुटका करण्यासाठी ध्वज बैठक आयोजित केली होती. मात्र, त्यावेळी काही सुटका झाली नाही. आज अखेर त्यांची सुटका झाली असून ते भारतात परत आहेत. दरम्यान, लष्कराने सांगितले कि अशा गोष्टी सामान्य असतात, दोनही बाजूंचे जवान नकळत सीमा रेषा ओलांडून दुसऱ्या देशात प्रवेश करतात. अशावेळी ध्वज बैठक आयोजित करून जवानाची सुटका केली जाते.
