सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल होत, ज्यामध्ये भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. हा हल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नेतृत्वाखाली करण्यात आल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच घरामध्ये झालेल्या तोडफोडीचे फोटो देखील व्हायरल करण्यात आला आहे. अनीस उद्दिन नावाच्या एका वापरकर्त्याने केलेल्या या पोस्टमध्ये दावा केला की कर्नल कुरेशी आणि त्यांच्या मुलावर हल्ला करण्यात आला, त्यांचे घर जाळण्यात आले आणि द्वेषपूर्ण घोषणा देण्यात आल्या, ज्यावरून असे सूचित होते की भारतात मुस्लिमांना स्थान नाही.
आणखी एका वापरकर्त्याने, @JN_Araain ने लिहिले: “RSS ने पुन्हा एकदा द्वेषपूर्ण हल्ला केला! मुस्लिम भारतीय लष्कर अधिकारी आणि प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी यांना लक्ष्य केले. पहाटे ३ वाजता बेळगावी येथील त्यांच्या घरावर हल्ला झाला, मुलगा समीरला क्रूरपणे मारहाण करण्यात आली, घर जाळण्यात आले. कुटुंब आता दिल्लीत लष्कराच्या संरक्षणाखाली आहे.”
दरम्यान, बेळगावचे पोलिस अधीक्षक (एसपी) डॉ. भीमाशंकर गुलेद यांनी या घटनेचा स्पष्टपणे इन्कार केला आहे, हे दावे पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले. “ही खोटी बातमी आहे,” असे अतिरिक्त एसपी एसएन श्रुती म्हणाल्या. “हे पोस्ट करणारे हँडलर देशाबाहेरचे आहेत. आम्ही त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवली आहे आणि तपास सुरू आहे.”
“नामकरणामुळे अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे वास्तव बदलणार नाही”
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी गीतेवर हात ठेवून घेतली शपथ; कोण आहेत अनिता आनंद?
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीपदाची शपथ
माजी संरक्षण सचिव अजय कुमार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव, पोलिसांनी कोन्नूर गावातील कर्नल कुरेशी यांचे सासरे गौसाब बागेवाडी यांच्या निवासस्थानी सुरक्षा तैनात केली आहे. गोकाक सर्कल पोलिस निरीक्षक (सीपीआय) सुरेश आरबी यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळाला भेट दिली. प्रकरणाची चौकशी सुरू असताना अधिकाऱ्यांनी कुटुंबाला अनावश्यक सार्वजनिक संवाद टाळण्याचा सल्ला दिला आहे.
