भारत-पाक युद्धादरम्यान पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीविरुद्ध भारताकडून संताप व्यक्त केला जात आहे. तुर्कीमध्ये जेव्हा भूकंप आला होता तेव्हा सर्वप्रथम भारताने धाव घेत मदत पाठविली होती. मात्र, तुर्की गद्दार निघाला त्याने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला, असे म्हणत भारतीय नागरिकांनी तुर्कीच्या मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत करत आहेत.
याचपार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतरांना देखील तुर्की वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. असे असताना एक मोठी माहिती समोर आली आहे. तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकल्याने पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन आले आहेत. अशा घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती देताना पुण्यातील व्यापारी सुयोग झेंडे म्हणाले, कामाच्या गडबडीत असताना मला फोन आला, परंतु मी तो उचलला नाही. त्यानंतर मला व्हॉइस मेसेज आला. तुम्ही पाकिस्तानचे, तुर्कीचे काहीच वाकडे करू शकत नाही. आमच्या मागे खूप मोठी यंत्रणा आहे, अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर मी सुद्धा फोनवर त्यांना सुनावले.
हे ही वाचा :
लोकायुक्तांची कर्नाटकमध्ये ३० ठिकाणी छापेमारी
सुप्रीम कोर्टाचा मंत्री विजय शाह यांना दणका
मुठभर शेंगदाणे खाल्याचे फायदे बघा !
राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देत तुर्कीयेच्या इनोनू विद्यापीठासोबतचा जेएनयूचा करार स्थगित
पाकिस्तानमधून धमकी आल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे का?, असा प्रश्न विचारला असता झेंडे पुढे म्हणाले, ‘अजिबात नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे मावळे आहोत. आम्हाला कसली भीती नाही. शिवाय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, अजित डोवाल हे सर्वजण आहेतच. पुण्यातील पोलीसही आमच्या सुरक्षेसाठी तत्पर आहेत.’ पाकिस्तानच्या या पोकळ धमक्यांचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंद रस्त्यावर फोडून टाकले आहेत आणि पाकिस्तान-तुर्कस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
