राहुल सोलापूरकर कोण आहे?, महाराजांबद्दल असे विधान का केले?. अशा घटनांमुळे शिवभक्तांना प्रचंड वेदना होतात. त्यांनी ‘लाच’ या शब्दाचा वापर केला. लाच घेणाऱ्या अशा लोकांना लाच पलीकडे काही दिसत नाही. जिभेला हाड नाही, उचलली जीभ लावली टाळ्याला असा यांचा प्रकार दिसून येतो. अशा लोकांच्या जीभा हासडल्याच पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधाने करणाऱ्यांना जनतेने ठेचून काढले पाहिजे, असे भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीका होत असताना छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही निषेध दर्शविला. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त करत अशा लोकांना ठेवून काढण्याची भाषा केली.
पत्रकार परिषदेत उदयन राजे म्हणाले, अशा लोकांना वेचून ठेचले पाहिजे. कारण अशा विकृतींमध्ये वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होवू शकतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री-गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेवून महापुरुषांविरोधी विधाने करणाऱ्यांवर कडक कारवाई करत देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणार आहे.
हे ही वाचा :
सॅम ऑल्टमन आयटी मंत्र्यांना भेटले
ईडीकडून १९ ब्रोकिंग कंपन्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल
धर्माची शिस्त पाळली नसल्याने १८ गैर हिंदू कर्मचाऱ्यांना डच्चू
महाराष्ट्रात १ कोटी तर मुंबईत १० लाख बांगलादेशी घुसखोर!
ते पुढे म्हणाले, यापुढे यांचे चित्रपट, ज्या ठिकाणी ते अभिनय करत असतील, ते हाणून पाडले पाहिजेत. सिनेसृष्टीतील दिग्दर्शकांनी अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे. अशा लोकांना गाडले पाहिजे, गोळ्या घातल्या पाहिजेत. उदयनराजे म्हणाले पुढे म्हणाले, अशा विधानावरून राहुल सोलापूरकरला औरंग्याची औलाद म्हटले पाहिजे.