देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने पुढील दोन वर्षांत ४० लाख घरांमध्ये सोलर रूफटॉप सिस्टम बसविण्यास मदत करण्याचा संकल्प केला आहे. एसबीआयच्या या उपक्रमामुळे भारतातील नवीकरणीय ऊर्जा उत्पादनाला चालना मिळणार आहे. एसबीआयने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “भारताच्या रिन्यूएबल एनर्जी ट्रान्झिशनमध्ये आघाडीची भूमिका बजावण्यासाठी, एसबीआयच्या सोलर रूफटॉप कार्यक्रमाचा उद्देश आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत ४० लाख घरे सौर ऊर्जेने सुसज्ज करणे आहे, जेणेकरून भारताच्या २०७० नेट झिरो लक्ष्याला गती मिळू शकेल.”
हा निर्णय एसबीआयच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. १ जुलै १९५५ रोजी एसबीआयने भारतात आपला व्यवसाय सुरू केला होता. बँकेने सांगितले की, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तिने कृषी पायाभूत सुविधा, कृषी-उद्योजकता, किसान उत्पादक संघटना आणि सहकारी संस्थांना पाठबळ देण्यासाठी ३.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.
हेही वाचा..
नाना पटोले ‘या’ कारणासाठी एक दिवसासाठी निलंबित!
बनावट पोलिस टोळीमार्फत सुरु होती लुट
श्रावणात या गोष्टींपासून राहा दूर
ट्रम्प यांनी एलन मस्कना काय दिली धमकी ?
एसबीआयच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, “२३,००० हून अधिक शाखा, ७८,००० कस्टमर सर्व्हिस पॉइंट्स (सीएसपी) आणि ६४,००० एटीएमसह एसबीआय आज खऱ्या अर्थाने प्रत्येक भारतीयाची बँक बनली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या दशकात एसबीआयच्या डिजिटल परिवर्तनाचा फायदा लाखो ग्राहकांना झाला आहे. बँकेने १.५ कोटी शेतकरी, १.३ कोटी महिला स्वयं-सहायता गट (SHG), पीएम स्वनिधी योजनेत ३२ लाख स्ट्रीट व्हेंडर्स, २३ लाख एमएसएमई, तसेच विविध योजनांद्वारे लाखो कारागिरांना मदत केली आहे.
बँककडे १५ कोटींहून अधिक जनधन खाती, १४.६५ कोटी पीएम सुरक्षा विमा योजना, १.७३ कोटी अटल पेन्शन योजना, आणि ७ कोटी पीएम जीवन ज्योती विमा योजना लाभार्थींचे व्यवस्थापन आहे.
