मुंबईत चालत्या ट्रेनमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. सोमवारी (९ जून) सकाळी ९.३० च्या सुमारास मध्य रेल्वेच्या मुंब्रा ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली. जखमीना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रेल्वे प्रशासनाकडून मदत कार्य आणि चौकशी सुरु आहे.
प्राथमिक वृत्तानुसार, मुंब्रा-दिवा या स्थानकादरम्यान लोकल ट्रेन आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना घासल्या गेल्यामुळे हा अपघात झाला. घटनेदरम्यान पुष्पक एक्सप्रेसमधील १० ते १२ प्रवासी दरवाज्याला लटकून प्रवास करत होते. यावेळी प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली आणि ही घटना घडली. दोन्ही ट्रेनचा स्पीड अतिशय जास्त होता, त्यामुळे जोरात धडक झाली अन् एकच आवाज झाला. त्यामुळे लोकल आणि ट्रेनमधून १० ते १२ प्रवासी पटरीवर खाली पडले.
या घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत प्रवाशांचे वय ३०-३५ दरम्यान असल्याचे वृत्त असून त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान, जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटकरत दिली.
हे ही वाचा :
जिंकता येईना, आता निवडणूक आयोगच वाकडा
हमीद – जयराम हे तर मनमोहन देसाईंचे अकबर-एन्थनी
फडणवीसांच्या लेखाने सारे बेजार कसे झालेत?
एकनाथ शिंदेंच्या गळ्यात ‘चंद्रहार’
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण ८ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
