27 C
Mumbai
Friday, January 28, 2022
घरअर्थजगतGDP ८.४ टक्के; भारतीय अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीत झेपावली

GDP ८.४ टक्के; भारतीय अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीत झेपावली

Related

जुलै-सप्टेंबरच्या तीन महिन्यांच्या कालावधीत भारताच्या अर्थव्यवस्थेने झेप घेतली आहे. चौथ्यांदा भारतीय अर्थव्यवस्थेने असा वेग घेतला आहे. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) दुसऱ्या तिमाहीत ८.४ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच काळात हे सकल राष्ट्रीय उत्पन्न ७.४ टक्के होते.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर त्याचा फायदा दिसू लागला आहे. पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था २०.१ टक्के वधारली होती तर दुसऱ्या तिमाहीत ती १७.५ टक्क्यांवर होती. या तिमाहीत उत्पादनाचा वेग ५.५ टक्के होता तर बांधकाम क्षेत्रात हा वेग ७.५ टक्के होता.

गेल्या वर्षी कोरोनाच्या लाटेमुळे मागे पडलेली अर्थव्यवस्था ही गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा रुळावर आली आहे. मे महिन्यात भारतातील रुग्णांची संख्या ४ लाख होती ती आता १० हजारांच्या आसपास आहे. लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट होत गेली. मात्र त्याचबरोबर अर्थव्यवस्थाही वेगाने वर येऊ लागली. लाट ओसरू लागल्यावर उद्योगांचे दरवाजे खुले झाले. बाजारपेठा फुलून गेल्या. विशेषतः सणासुदीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला उसळी घेता आली.

आता ओमिक्रॉन या नव्या व्हेरियन्टचे सावट जगावर पडले असले तरी त्याचा नेमका किती फटका बसेल हे अद्याप स्पष्ट नाही.

यासंदर्भात एचडीएफसीच्या अर्थतज्ज्ञ साक्षी गुप्ता सांगतात की, पहिल्या तिमाहीपेक्षा दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेला मिळालेली झळाळी सकारात्मक आहे.

 

हे ही वाचा:

…म्हणून ट्विटर संस्थापक डॉर्सी यांची पहिली पसंती होती पराग अग्रवाल!

‘हा भारतीय वंशाचा सीईओ विषाणू आहे; याच्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही’

न्यायाधीश चांदीवाल यांनी सचिन वाझे आणि पोलिसांनाही खडसावले

83 च्या ट्रेलरवर लाखो चाहत्यांच्या उड्या

 

जुलै सप्टेंबरच्या या तिमाहीत हॉटेल आणि सेवा क्षेत्रातही चांगली वाढ झाली आहे. हॉटेल्स आणि वाहतूक क्षेत्रात ८.२ टक्के वाढ झाली आहे. सेंट्रल बँकेने या वर्षात ९.५ टक्के इतकी वाढ अपेक्षित केली आहे. मूडीजने ही वाढ ९.३ टक्के होईल असा अंदाज बांधला आहे. कृषी, उद्योग आणि सेवा या तीन आघाड्यांवर उत्पादन वाढले तर त्या आधारावर जीडीपीचा दर ठरवला जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,597अनुयायीअनुकरण करा
5,850सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा