27 C
Mumbai
Tuesday, March 18, 2025
घरक्राईमनामाकोकेन, हेरॉईन या ड्रग्सला मागे टाकत हेड्रोपोनिक गांजा तस्करीत अव्वल

कोकेन, हेरॉईन या ड्रग्सला मागे टाकत हेड्रोपोनिक गांजा तस्करीत अव्वल

Google News Follow

Related

कोकेन, हेरॉईन, चरस या अमली पदार्थांना मागे टाकत हेड्रोपोनिक विड (गांजा) ने अमली पदार्थांच्या बेकायदेशीर धंद्यात बाजी मारली आहे. अमली पदार्थामध्ये हेड्रोपोनिक विडला भारतात मोठी मागणी असल्यामुळे तस्करीचे प्रमाण देखील वाढले आहे. बँकॉक येथुन भारतात हेड्रोपोनिक विड ची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याचे मागील दोन महिन्यात मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईतुन समोर आले आहे. एनसीबी, डीआयआर आणि कस्टम विभागाने जानेवारी ते फेब्रुवारी २०२५ या दोन महिन्यात केलेल्या कारवाई शेकडो कोटींच्या हायड्रोपोनिक विड सह अनेकांना अटक केली आहे.

अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार हेड्रोपोनिक विड (गांजा) चे सेवन भारतात मोठ्या प्रमाणात वाढले आहे, उच्चभ्रू पासून ते अगदी कॉलेज तरुणांमध्ये हेड्रोपोनिक गांजाची क्रेज आहे.भारतात गांजाच्या शेती बेकायदेशीर मानली जात असल्यामुळे हेड्रोपोनिक गांजा परदेशात सर्रासपणे उगवला जात आहे,बँकॉक मध्ये हेड्रोपोनिक विड मोठ्या प्रमाणात उगवले जाते आणि त्याची तस्करी भारतात करण्यात येत आहे.

१ फेब्रुवारी २०२५ मध्ये मुंबई कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाच प्रवाशांना अटक केली आणि त्यांच्याकडून बेकायदेशीर बाजारात आणले जाणारे ५० किलो हायड्रोपोनिक वीड (मारिजुआना) जप्त केले, ज्याची किंमत ५० कोटी रुपये आहे. हे प्रवासी बँकॉकहून मुंबईला आले होते.

दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस युनिट (एआययू) ने चार प्रवाशांना अटक केली आणि त्यांच्याकडून १३,९२३ ग्रॅम हायड्रोपोनिक वीड (गांजा) जप्त केला होता. ज्याची किंमत बेकायदेशीर बाजारात सुमारे १३.९२ कोटी आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी बँकॉकहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) दोन वेगवेगळ्या विमानांनी पोहोचले होते, त्यांच्या ट्रॉली बॅगमध्ये हा बंदी घातलेला माल लपवून ठेवण्यात आला होता.

प्रवीण कुमार सिंग (२२), सूरज उपाध्याय (२३), शिवम यादव (२०) आणि मयंक दीक्षित (२३) यांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली. हे चारही आरोपी गुजरातमधील सुरत येथील होते. सुरुवातीला सिंग आणि उपाध्याय यांना बँकॉकहून येत असताना त्यांना रोखण्यात आले. नंतर बँकॉकहून वेगळ्या विमानाने आलेल्या दीक्षित आणि यादव यांना थांबवण्यात आले, असे सीएसएमआयएमध्ये तैनात असलेल्या एआययू अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा : 

भारताकडून अमेरिकन आयातीवरील कर कमी करण्यास सहमती; ट्रम्प यांचा दावा

महिला दिनानिमित्त सीएसएमटी- साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’चे सारथ्य महिलांच्या हाती

माशांच्या हालचालींवर नजर ठेवायला चीन- मालदीवमध्ये करार? नक्की हेच कारण की ड्रॅगनचा वेगळाच मनसुबा?

मणिपूरमध्ये लष्कराच्या विशेष कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त; बंकरही केले उध्वस्त

२५ फेब्रुवारी रोजी बँकॉक येथून आलेल्या आणखी पाच जणांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते.या पाचही प्रवाशांच्या सामानाची झडती घेण्यात आली असता त्यांच्याकडे ५६.२६ किलोग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक तण (गांजा) जप्त करण्यात आला आहे.जप्त करण्यात आलेल्या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे ५६.२६ कोटी रुपये आहे. रवी देवाभाई ओडेदरा (३०), रमेश वेजा ओडेदरा (३१), भरतभाई मोधवाडिया (३७), नाथाभाई रामाभाई ओडेदरा (३५) आणि राम करशन भुतिया (२४, सर्व रा. गुजरातमधील पोराबंदर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
236,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा