मालाड मालवणी येथे प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असल्याच्या, सरकारी जमिनींवर ताबा मिळविण्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून केल्या जात आहेत. बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरीचीही मोठी समस्या या भागात आहे. त्यामुळेच तेथील स्थानिक हिंदूंच्या छळाच्या घटनांतही वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या सगळ्या अनधिकृत बांधकामांना स्थानिक आमदार म्हणून अस्लम शेख यांच्याकडून विरोध होत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यावर न्यूज डंकाने प्रकाश टाकल्यानंतर त्याची योग्य दखल प्रशासनाकडून घेतली गेली आणि या अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त कारवाईत मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरातील सरकारी जमिनीवरील तब्बल १३५ अनधिकृत झोपडपट्टी बांधकामे पाडण्यात आली. ही मोहीम रविवारी सकाळपासून सुरू राहिली असून, अतिक्रमण हटविण्याची ही आतापर्यंतची मोठी कारवाई मानली जाते.
नागरी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही कारवाई अली तलाव आणि चिकुवाडी या दोन प्रमुख ठिकाणी करण्यात आली. अली तलाव परिसरात १२७ अनधिकृत झोपडपट्टी बांधकामे पाडण्यात आली, तर चिकुवाडी भागात ८ बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला, ज्यामध्ये ६ झोपडपट्टी युनिट्स आणि २ अतिरिक्त अनधिकृत संरचना समाविष्ट होत्या.
सरकारी जमीन अतिक्रमणातून परत मिळविण्यासाठी आणि भविष्यातील बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. पाडकाम मोहिमेसाठी बीएमसीने जड यंत्रसामग्री तसेच मोठे मनुष्यबळ तैनात केले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांवर शून्य सहिष्णुतेची भूमिका कायम ठेवण्यात येईल. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील.
हे ही वाचा:
जेवणासाठी हत्येचा थरार! साकिनाक्यात वादातून मित्राचा जीव घेतला
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके: स्वातंत्र्याची पहिली जाज्ज्वल्य ज्योत
भारताची मोठी तांत्रिक झेप ठरली ऐतिहासिक
मालवणीच्या लोकसंख्येचे गणित बदलण्याचे काम अत्यंत शांतपणे सुरू आहे. अनेक आदिवासी वस्त्यांवर अतिक्रमण झालेले आहे. तिवरांची वने तोडून झोपड्या वसवण्यात आलेल्या आहेत. इथे पर्यावरणवाले येत नाही. पोलिस आणि पालिकेचे अधिकारी चिरीमिरी घेऊन बाजूला होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातो. इतकी अतिक्रमणे झाली नव्या झोपड्या रोज उभ्या राहतायत. परंतु स्थानिक आमदार अस्लम शेख यांची एकही तक्रार नाहीत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. इथे सरकारी जमीनी गिळल्या जातायत. संरक्षण मंत्रालयाच्या जमिनींवर अतिक्रमण होते आहे. तिवरांची व्यवस्थित साफसफाई सुरू आहे.
मालवणीत अलिकडेच पालकमंत्री महोदय मंगलप्रभात लोढा यांचा झालेला जनता दरबार गाजला. बोरीवलीचे भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी आमदाराची खरडपट्टी काढली. ६ ऑक्टोबर रोजी रात्री मालवणीतील प्रवीण राजपूत परिवारावर एका जमाल आणि इजहार मलिक या दोन मुस्लीम गुंडानी हल्ला केला. सोबत त्यांचे पाच-सहा जणांचे टोळके होते. राजपूत यांच्या घरातील दोन तरुण मुली आणि ७० वर्षाची म्हातारी या हल्ल्यातून सुटली नाही. ज्याने हत्याराने वार केले, तो जमाल एका खासगी नर्सिंगहोम मध्ये एडमिट झाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात १० दिवस कोणतीही कारवाई केली नाही. पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार संजय उपाध्याय यांच्या दबावानंतर जमालला अटक कऱण्यात आली. त्याचा भाऊ इजहार हा मात्र पोलिसांना सापडलेला नाही. मात्र आता अनधिकृत बांधकामांवर केलेल्या धडक कारवाईमुळे स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.







