तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातील एका हायस्कूलच्या विद्यर्थिनिवर तिच्या शाळेतील तीन शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नातेवाईकांनी निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
यातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे त्यांच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी गेल्या महिनाभरापासून शाळेत गैरहजर होती. मुख्याध्यापकांकडे चौकशी केल्यावर आईने कथित प्रकरणाचा खुलासा केला. मुख्याध्यापकांनी तिला ताबडतोब पोलिस तक्रार करण्याचा आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा..
दंतेवाडात पाच महिलांसह सहा माओवाद्यांचे आत्मसमर्पण !
पाकचे पंतप्रधान म्हणतात, काश्मीरसह सर्व प्रश्न भारताशी चर्चेद्वारे सोडवायचेत
काश्मीर हा पाकिस्तानचा, हिसकावून घेऊ! दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा बरळला
मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. कृष्णगिरी सर्व-महिला पोलिसांच्या पथकाने तीन आरोपी शिक्षकांना अटक केली आहे, ते आता १५ दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत.