पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या मोहिमेत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना यशस्वीरित्या उध्वस्त केलं. एअर स्ट्राईक करत भारताने ही कामगिरी चोख बजावली. ऑपरेशन सिंदूरच्या यशात एअर ऑपरेशनचे महासंचालक (डीजीएमओ) एअर मार्शल ए. के. भारती यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर त्यांनी लष्कराने घेतलेल्या पत्रकार परिषदांमधून मोहिमेची योग्य माहिती नागरिकांना दिली.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अधिकाऱ्याने बजावलेल्या भूमिकेबद्दल एअर मार्शल ए. के. भारती यांच्या कुटुंबाने आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे. एअर मार्शल ए. के. भारती यांचे वडील जीवछलाल यादव म्हणाले की, त्यांच्या मुलाने देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना खूप अभिमान आहे. ऑपरेशनपूर्वी काहीही माहित नव्हते, पण जेव्हा वर्तमानपत्रात प्रकाशित होऊ लागले तेव्हा मला खूप अभिमान वाटला. तो देशासाठी जे काही करत आहे त्याचा अभिमान आहे. शिवाय माझ्या देशाचे कौतुक होत आहे याचा मला खूप आनंद आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने स्वतःचे नाव कमावले आहे. माझ्या मुलाने त्याचे नेतृत्व केले याचा मला आनंद आहे, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
ए. के. भारती यांच्या मेहुणी किरण यांनीही आपला आनंद व्यक्त केला आहे. “आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. ही केवळ आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण बिहार आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
भारतविरोधी प्रचार करणाऱ्या चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’वर भारतात बंदी
कर्नल सोफिया कुरेशींच्या घरावर हल्ल्याची खोटी बातमी; आरएसएसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न!
“नामकरणामुळे अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे वास्तव बदलणार नाही”
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी गीतेवर हात ठेवून घेतली शपथ; कोण आहेत अनिता आनंद?
ए. के. भारती यांना १९८७ मध्ये फ्लाइंग ब्रांचमध्ये नियुक्त करण्यात आले. ते एक फायटर कॉम्बॅट लीडर असून डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे पदवीधर आहेत. ते सुखोई- ३० एमके स्क्वाड्रनचे फ्लाइट कमांडर होते. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना ‘थ्री स्टार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांना एअर मार्शल पदावर बढती देण्यात आली.
