भारत-पाक युद्धबंदी झाली असली तरी दहशतवाद विरोधी कारवाई सुरूच राहणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. त्यानुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध कारवाई सुरूच आहे. या कारवाई दरम्यान काल (१३ मे) शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पूर्णपणे सतर्क आहे आणि दहशतवाद्यांवर कारवाई सुरूच आहे. शोपियानमध्ये ठार करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून शाहिद कुट्टे आणि अदनान शफी दार अशी त्यांची नावे आहेत. तर तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त केला आहे. तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
“कोहली-रोहित युग संपलं… आता युवा वादळ उठणार!”
WTC साठी झुंजणार… आणि आयपीएलमध्ये उरणार पोकळी!
भारतविरोधी प्रचार करणाऱ्या चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’वर भारतात बंदी
कर्नल सोफिया कुरेशींच्या घरावर हल्ल्याची खोटी बातमी; आरएसएसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न!
लष्कराने सांगितले की, १३ मे रोजी राष्ट्रीय रायफल्स युनिटला शोपियानमधील शोकल केलरच्या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली. विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, भारतीय सैन्याने शोध मोहीम सुरू केली. कारवाईदरम्यान, दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला आणि दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. सध्या ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक कमांडर असल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाने सांगितले कि शोध मोहीम अजूनही सुरू असून सर्वत्र नजर ठेवली जात आहे.
शोपियां में भारी मात्रा में हथियार बरामद…. आतंकियों के पास से हथियार बरामद
#Pakistan #IndiaTVWithIndianArmy #IndianArmy #OperationSindoor2 #PMModi @ParasharPrachi @manishindiatv pic.twitter.com/AmktDRGRGd
— India TV (@indiatvnews) May 14, 2025
