उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवारी म्हटले की, “आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज योग करतात आणि त्यामुळेच ते अतिशय तंदुरुस्त आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. हे आपण सर्वांनी पाहिले असून पाकिस्तानलाही भारताची ताकद समजली आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटले, “आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. मी सर्व नागरिकांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. योग दिन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येकाने तो आपल्या आयुष्यात अवश्य स्वीकारावा. योगाची प्रेरणा आपल्याला थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळाली आहे.
शिंदे म्हणाले की, “पंतप्रधान मोदींच्या अथक प्रयत्नांमुळेच संयुक्त राष्ट्र संघाने योग दिनाला आंतरराष्ट्रीय मान्यता दिली आहे. आज तुम्ही सर्वांनी पाहिले की, विशाखापट्टणममध्ये तीन लाख लोकांबरोबर पंतप्रधानांनी एकत्र योग साधना केली. ते दररोज योग करतात आणि त्यामुळेच ते फिट आहेत. नुकतेच तुम्ही पाहिले असेल की, आमचे हे फिट पंतप्रधान कसे पाकिस्तानला चितपट करून गेले.
हेही वाचा..
गुंतवणुकीच्या दुनियेतील किमयागार…
दिल्लीत मुस्लीम गटाकडून इस्रायलविरुद्ध निदर्शने, खामेनी आणि इराणसोबत उभे असल्याचे पोस्टर्स!
सिंधू करार स्थगितीचा पाकला बसतोय फटका, नद्यांमधील पाणी २० टक्क्यांनी झाले कमी!
ते पुढे म्हणाले की, “केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकार एकत्रितपणे राज्याच्या प्रगतीसाठी काम करत आहे. आतापर्यंत बरेच विकासकाम झाले आहे आणि पुढेही ते वेगाने सुरू राहील. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोशल मीडियावर योगाबद्दल पोस्ट करत लिहिले, “योग शरीर, मन, चेतना आणि आत्म्यात समतोल निर्माण करतो. नियमित योग हे उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा.
महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत लिहिले, “योग ही अशी मानसिकता आहे जी वैयक्तिक कल्याणासोबत आपल्या पृथ्वीचेही पोषण करते. योग दिनानिमित्त त्यांनी सर्वांना आवाहन केले की, “चला, आपण योगाला अंतर्मुख संतुलनाचा मार्ग मानून जीवन जगूया आणि प्रत्येक सजग कृती व पर्यायाच्या माध्यमातून आपल्या पृथ्वीला साथ देऊया.
