काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (३ फेब्रुवारी) संसदेमध्ये सरकारवर केलेल्या आरोपावरून लोकसभेत गोंधळ निर्माण झाला. भारतीय जमिनीवर चीनने कब्जा केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. तसेच चीन आपल्या सीमेत घुसल्यामुळे मेक इन इंडिया अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले. राहुल गांधींच्या आरोपनंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्यावर सभागृहात खोटी विधाने केल्याचा आरोप केला. राहुल गांधीनी त्यांचे सर्व दावे सिध्द करावेत किंवा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा. जर राहुल गांधी त्यांचे दावे सिद्ध करू शकले नाहीत तर लोकसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार त्यांच्यावर विशेषाधिकाराची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच नेहरूजींनी भारताची जमीन चीनला दिली, काँग्रेस पक्षाचा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी करार आहे, राहुल गांधी लोकसभेत चीनच्या प्रतिनिधीसारखे बोलतात, असेही निशिकांत दुबे म्हणाले.
लोकसभा सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना, दुबे यांनी संसदीय कार्यपद्धतींवरील एका पुस्तकाचा हवाला देत म्हटले की, विरोधी पक्षनेता हा असा असावा की ज्याला संसदीय नियमांची, देशाची, पंतप्रधानांची माहिती असेल. ते पुढे म्हणाले, या सभागृहात हा माझा चौथा कार्यकाळ आहे आणि पहिल्यांदाच मी अशा विरोधी पक्षनेत्याला पाहत आहे जो जगात भारताला कसे कमकुवत करता येईल, देशाचे तुकडे कसे करता येतील, या दिशेने काम करत आहेत.
दुबे पुढे म्हणाले, ‘मी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आव्हान देतो की जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी त्यांची सर्व विधाने सिद्ध करावीत नाहीतर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा.’ राहुल गांधींनी त्यांचा मोबाईल फोन दाखवला होता आणि दावा केला होता की तो देशातच तयार केला गेला आहे, परंतु काँग्रेसनेच देश परकीयांकडे “गहाण” ठेवला होता.
भाजप खासदार दुबे यांनी दावा केला की, १९९६-९७ मध्ये पी चिदंबरम अर्थमंत्री आणि वाणिज्यमंत्री असताना, युरोपियन युनियनच्या दबावाखाली त्या सरकारने आंतरराष्ट्रीय दूरसंचार करार (ITA-१) वर स्वाक्षरी केली होती. या करारामुळे इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर इत्यादींवरील शुल्क शून्य झाले, असे त्यांनी सांगितले. दुबे यांनी दावा केला की केवळ १४ देशांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे आणि चीनचा सहभाग नव्हता.
हे ही वाचा :
मणिपूरमधून दहशतवादी संघटनांच्या सात सक्रिय सदस्यांना अटक
समान नागरी कायद्यासाठी आता गुजरातचा पुढाकार
महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरण: अफवा पसरवणाऱ्या ८ जणांविरुद्ध एफआयआर!
अतुल भातखळकरांनी घेतली त्यांच्या १०१ वर्षांच्या आजीची सदिच्छा भेट!
दुबे म्हणाले, ‘आम्ही खेळणी निर्मितीत पहिल्या क्रमांकावर होतो. आता चिनी आले आहेत. मोबाईल फोन आणि त्यांच्या सुटे भागांमध्येही चिनी लोकांचा शिरकाव झाला आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ पुढे नेण्याबद्दल बोलले. २०१५ मध्ये जेव्हा ‘आयटीए-२’ आला तेव्हा पंतप्रधानांच्या आदेशानुसार सरकारने त्याचे सदस्य होण्यास नकार दिला, म्हणूनच आज आपण मोबाईल फोनचे नंबर वन उत्पादक आहोत.
स्वातंत्र्यापासून चीनसोबतच्या सीमाप्रश्नासाठी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यानंतरच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना जबाबदार धरले आणि दावा केला की ‘तिबेट देऊन तुम्ही (काँग्रेस) चीनला आमच्या डोक्यावर बसवले आहे. १९८१ मध्ये राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी एक करार केला. चीनच्या त्यावेळीच्या वित्तमंत्र्यांनी करारावर स्वाक्षरी केली. १९८१ ते १९८७ पर्यंत, जेव्हा राहुल गांधींचे वडील पंतप्रधान होते, तेव्हा चीनसोबत आठ वेळा द्विपक्षीय चर्चा झाल्या आणि या सर्व फेल गेल्या. जर नेहरूजींच्या काळात चीनने जमीन घेतली नव्हती. तर मग इंदिरा, राजीव गांधींनी ती समिती का स्थापन केली?, आठ वेळा चर्चा का केली?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, तुम्ही सैन्याला आत येऊ दिले, तुम्ही लडाखला पोहोचलात, तुम्ही अरुणाचलला पोहोचलात, तुम्ही तिबेट देवून चीनला आमच्या डोक्यावर बसवले आहे. आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे आणि पुढाकारामुळे चीनसोबतचा वाद मिटत असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान मोदींच्या मजबुतीमुळे आज जगभरात चीन त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधानांचे कौतुक करण्याऐवजी काँग्रेस नेते ते त्यांना बदनाम करत आहेत आणि देशाची दिशाभूल करत आहेत. नेहरू, इंदिरा, राजीव गांधी यांच्या समस्याचे निराकरण तुम्ही करू शकला नाहीत.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी समस्याचे निर्करण केले तर तुमचे सर्व विषय संपून जातील. कारण चीन सोबत तुमचा करार आहे. काँग्रेस पक्षाने चिनी कम्युनिस्ट पक्षासोबत कोणता करार केला आहे?, तुम्ही लोकसभेत चीनच्या प्रतिनिधीसारखे बोलत आहे. पंतप्रधान मोदींना बदनाम करण्यासाठी, देशाला गुमराह करण्यासाठी हे करत आहात, माफी मागितली पाहिजे, असे निशिकांत दुबे म्हणाले.
राहुल गांधी जी नेहरु जी ने भारत के ज़मीन को चीन को दे दिया,कॉग्रेस पार्टी का समझौता चीन के कम्युनिस्ट पार्टी से है,आप लोकसभा में चीन के प्रतिनिधि की तरह बात करते हैं pic.twitter.com/tnNP63aCwr
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) February 3, 2025