भारताने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे झालेले नुकसान पाकिस्तान कडून वारंवार लपवण्यात येत असून खोटे दावे केले जात आहेत. अशातच आता पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी स्वतःच भारताच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानमधील एअरबेसचा कसा वेध घेतला याची कबुली दिली आहे. त्यामुळे एकीकडे विजयोत्सव साजरा करणारा पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटला आहे. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी कबूल केले की, भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी १० मे रोजी नूर खान एअरबेस आणि इतर ठिकाणी हल्ला केला होता. शरीफ यांची कबुली ही दुर्मिळ असून भारताच्या लष्करी कारवाईच्या बाबतीत पाकिस्तानच्या नेहमीच्या नकाराच्या भूमिकेच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांच्या या कबुलीने जगाचे लक्ष पुन्हा एकदा भारताच्या धडक कारवाईकडे वळले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी रावळपिंडीतील नूर खान एअरबेस आणि इतर ठिकाणी भारताने केलेल्या अचूक क्षेपणास्त्र हल्ल्याची कबुली दिली. शुक्रवारी पाकिस्तान स्मारकात आयोजित एका समारंभात बोलताना शरीफ म्हणाले की, “१० मे रोजी पहाटे २:३० वाजता जनरल सय्यद असीम मुनीर यांनी मला सेक्युर लाईनवरून फोन केला आणि भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर भागात मारा केल्याची माहिती दिली. आमच्या हवाई दलाने देशाला वाचवण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला तसेच चिनी विमाने आणि आधुनिक उपकरणे, तंत्रज्ञानाचा वापर केला,” असे ते म्हणाले. शेहबाज शरीफ यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा :
राऊतांचे पुस्तक म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट!
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेची धुरा सहपोलिस आयुक्तांच्या खांद्यावर
दिल्लीत १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक!
भाजपा आमदार रवींद्र सिंह नेगी यांनी बेटिंग सेंटरवर चालवला बुलडोझर!
शेहबाज शरीफ यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, भाजपाचे आयटी प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट केले की, “पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ स्वतः कबूल करतात की जनरल असीम मुनीर यांनी त्यांना पहाटे २:३० वाजता फोन करून भारताने नूर खान हवाई तळ आणि इतर अनेक ठिकाणी बॉम्बहल्ला केल्याची माहिती दिली. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मध्यरात्री हल्ल्याच्या बातम्यांनी जाग आली. हे ऑपरेशन सिंदूरच्या प्रमाण, अचूकता आणि धाडसाबद्दल बरेच काही सांगते.”
Pakistan PM Shehbaz Sharif himself admits that General Asim Munir called him at 2:30am to inform him that India had bombed Nur Khan Air Base and several other locations. Let that sink in — the Prime Minister was woken up in the middle of the night with news of strikes deep inside… pic.twitter.com/b4QbsF7xJh
— Amit Malviya (@amitmalviya) May 16, 2025
